लोहोणेर च्या युवकाने नागरी सेवा ( UPSC ) परीक्षेत उमठवला ठसा..

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : -आपल्या व्यवसायात, राजकारणात अथवा शिक्षणात अपयश आले तर अनेक जण खचून आपला रस्ता बदलणे पसंत करतात. पण एक, दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा अपयश पचविताना लोहोणेर येथील रहिवाशी असलेला युवक सुदर्शन नानासाहेब सोनवणे याने नागरी सेवा परीक्षेत यशातून कसर भरून काढली आहे. संयमातून यशाला गसवणी घालणारा सुदर्शनची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आहे.सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले लोहोणेर येथील मूळचे रहिवाशी नानासाहेब सोनवणे हे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळच्या पंचवटी आगारात वाहक म्हणून नोकरीस आहेत. आई घरकाम करते.आपल्या मुलांनी खूप शिकावे, अशी त्यांची सुरवातीपासून भावना राहिली. सुदर्शन घरातील सर्वांत मोठा मुलगा असल्याने, त्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. लासलगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतल्या नंतर खेडगाव (ता. दिंडोरी) येथून बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतल्यानंतर पुढे कला शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. २०१४ ला पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. थेट पुणे गाठत तयारी सुरू केली. कोरोना अडथळ्यात अभ्यासात खंड पडू न देता नाशिकला अभ्यास सुरू ठेवला. कुटुंबीयांसह आई रंचना व दोघा लहान भावांकडून पाठबळ मिळाल्याचे सुदर्शन सांगतो. यूपीएससी परीक्षांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने सुदर्शनने एमपीएससी परीक्षा दिल्या नाहीत. यादरम्यान परीक्षेत यश आले. यापैकी दोन वेळा तर मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. परंतु थोडक्यात संधी हुलकली होती. मिळालेल्या यशाविषयी सुदर्शन म्हणाला, की आपण किती तास अभ्यास करतो, यापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता कशी आहे, यावर यश अवलंबून असते. सुरवातीच्या काळात मीदेखील दहा, बारा तास अभ्यास करायचो. परंतु नंतर मर्यादित वेळ परंतु लक्षपूर्वक अभ्यास करायला सुरवात केली. स्वयंअध्ययन हा महत्त्वाचा घटक असल्याचेही आवर्जून नमूद केले.


-----------------------------------------------------




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :