देवळा येथे प्रहार संघटनेचे "वाघ्या मुरळीसह" उपोषण : तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी.

देवळा -देवळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणीसाठी मंगळवारी (दि १४) रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जुन्या तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. विशेष करून ह्या उपोषणस्थळी “वाघ्यामुरळी” पथकाला पाचारण करण्यात आल्याने या पथकासह सुरू झालेले हे आगळेवेगळे उपोषण बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . देवळा येथील जुन्या तहसिलदार कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्यांना खर्डे रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात जागा उपलब्ध करुन द्यावी ,अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नवीन तहसील व अन्य कार्यालये देवळा शहरापासून चार किलोमीटरवर अंतरावर असल्याने वयोवृद्ध गोरगरिबांना व अपंग बांधवाना तसेच शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे. तसेच एका कामासाठी अनेक वेळा येरझाऱ्या घालाव्या लागतात . नवीन प्रशासकीय इमारतीच्या चौफेर व अंतर्गत भरपूर जागा रिकामी व रिक्त आहे . संबंधित मुद्रांक विक्रेत्यांना जुने तहसील कार्यालय येथून नवीन प्रशासकीय इमारतीत जनहितार्थ स्थलांतरित करण्यात यावे ,यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे . याची संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नसल्या कारणाने प्रहार संघटनेने निषेध व्यक्त करून मंगळवारी ( दि १४) रोजी बेमुदत उपोषण सुरू केले . या उपोषणाला खेड्यापाड्यातील नागरिकांनी हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शविला . तर अनके राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली . प्रहार संघटनेने ” वाघ्या मुरळी ” पथकासह उपोषणास सुरुवात केल्याने या आगळ्यावेगळे उपोषण बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती . उपोषणस्थळी गर्दी वाढल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर ,दशरथ पुरकर , शशिकांत पवार , अर्जुन देवरे, नानाजी आहेर ,काकाजी देवरे शहराध्यक्ष हितेंद्र आहेर आदिंसह कांदा उत्पादक संघनेचे जिल्हा सरचिटणीस दुष्यंत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ बाळासाहेब पवार, , दिनेश देवरे ,सुनील पगार, रमेश पवार, उमेश सोनवणे, एन एस भामरे आदी उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार विजय बनसोडे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांना प्राप्त निवेदनावरून आपली मागणीचे पत्र जिल्हाधिकारी गृह शाखा यांचेकडे पुढील निर्णयासाठी पाठविण्यात आले असून ,वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन प्राप्त झालेवर मुद्रांक विक्रेत्यांना नवीन प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल ,असे लेखी आश्वासन दिल्याने बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :