सटाणा येथे जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांची धाड. लाखों-रुपयांचा मुद्देमाल जप्त.

सटाणा -सटाणा शहरातील हॉटेल सम्राट पॅलेस बियरबार च्या तळमजल्यावर धाड टाकत जुगार खेळताना बारा संशयितांना रंगेहात पकडून सुमारे २ लाख ९७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सटाणा पोलिस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी पदभार घेताच अवैधधंदे चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही धाड रविवारी (या.१२) रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करून आपल्या पथकासह बियर बार च्या तळमजल्यावर धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :