लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी होते. तर हिंदी विषयाचे अध्यापन करणारे डी. बी. आहिरे, आर. व्ही. पाटील, एम. पी. बच्छाव, एन. एस. आहिरे, एस. एल. जाधव आदींसह राकेश थोरात व डी. के. आहेर व्यासपीठावर उपस्थित होते. हिंदीचे ज्येष्ठ साहित्यकार मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हिंदी दिनाच्या निमित्ताने हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. बी. एखंडे यांनी केले. विद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता शैलेंद्र मगर हिने हिंदी दिनाचे महत्व आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.ज्येष्ठ शिक्षक डी. बी. आहिरे यांनी हिंदी दिवस का साजरा केला जातो या मागची पार्श्वभूमी सांगत हिंदी दिनाचे महत्व विशद केले. शिक्षक एस. बी. एखंडे यांनी हिंदी चारोळ्याचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी यांनी अध्यक्षीय मनोगत हिंदीतुन सादर करत सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंधलेखन,वक्तृत्व स्पर्धा व ऑनलाईन सामान्यज्ञान प्रश्न मंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. बी. एखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig