लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - चणकापूर धरणक्षेत्रात तसेच सुरगाणा व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई आज दुपार पासून दुथडी भरून वाहते आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिना उलटूनही गिरणा नदीच्या उगमस्थान असलेल्या सुरगाणा सह कसमादे पट्ट्यात समाधानकारक पाऊस न झाल्या मुळे ऐन पावसाळ्यात सुद्धा गिरणा नदीला पुराचे पाणी वाहून गेले नाही.मात्र गेल्या दोन दिवसांत सुरगाणा तालुक्यात व गिरणा नदीच्या उगमस्थानी केमच्या डोंगर परिसरात व कळवण तालुक्यातील सतत धार पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रात आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. आज दुपारच्या वेळी अचानकपणे गिरणा नदीच्या पात्रात पूर पाण्याची वाढ झाल्याने बघ्यानी नदी काठांवर गर्दी केली होती.
पुर्ण व्हिडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करा. 👇👇👇
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig