लोहोणेर येथे रुद्रयोग सन्मान पुरस्कार सोहळा प्रांतधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न

लोहोणेर प्रतिनिधी- लोहोणेर येथे रुद्रयोग बहुउद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आयोजित रुद्रयोग सन्मान पुरस्कार सोहळा २०२१ अंतर्गत विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन जनता विद्यालय लोहोणेर च्या प्रांगणात कोरोना नियमांचे पालन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चांदवड -देवळा तालुक्याचे प्रांताधिकारी मा. चंद्रशेखर देशमुख होते.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुनम पवार या होत्या. त्याच बरोबर पंचायत समिती सदस्या श्रीमती कल्पनाताई देशमुख,रुद्रयोग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख, उपसरपंच रेश्मा ताई आहीरे,मुख्याध्यापक बैरागी सर,कृषी कन्या प्रियंका जोशी,प्रा.संतोष सुर्यवंशी, पर्यवेक्षक पवार सर किशोर पगार,सतिष निकम सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते लोहोणेर परिसरातील १०वीच्या परिक्षेत घव घवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
तसेच प्रियांका जोशी यांना शेतकऱ्यांचा न्याय व हक्कासाठी आपल्या कविता, भाषणातून आवाज उठविला शिवचरित्र व महीला सक्षमीकरण, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी राज्यात प्रबोधन केले.अशा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रातंधिकारी देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांना शालेय जिवनापासुन शिक्षकांनी, पालकांनी स्पर्धा परिक्षेचे धडे देण्याची अपेक्षा व्यक्त करत स्पर्धा परिक्षे विषयी मार्गदर्शन केले.व संस्थेने केलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.तर प्रियांका जोशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात प्रवेश करा.व आपल्या माता-पिता, शिक्षकांचे नाव उज्ज्वल करा असे सागंत गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोज देशमुख यांनी तर सूत्रसंचालन सुनिल ऐखंडे सर यांनी केले.विशाल देशमुख यांनी आपल्या आभार प्रदर्शनात उपस्थित सर्वच घटकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदित्य शेवाळे, अनिल गायकवाड, सागर परदेशी, प्रकाश आहेर, करण आहीरे, प्रशांत बागुल,गौरव परदेशी तर जनता विद्यालयाचे शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :