राष्ट्रवादी काँग्रेस देवळा तालुका अल्पसंख्यांक सेल च्या अध्यक्ष पदी रईस पटेल तर ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी सुरेश जगदाळे यांची निवड..

देवळा( प्रतिनिधी ) :-- नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे कार्यक्रमात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे व जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळा तालुका अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी रईस पटेल (सावकी ) तर ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी सुरेश जगदाळे (माळवाडी ) यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती आदेशाचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. रईस पटेल व सुरेश जगदाळे यांच्या निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    रईस पटेल हे देवळा तालुक्यातील सावकी येथील युवा कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षा पासुन पक्षाचे तळमळीने काम करित आहेत. आणि याचीच पावती म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे व जिल्हाध्यक्ष रविंद्रन पगार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
  तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक व ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द व प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित देवळा तालुकाध्यक्ष रईस पटेल व सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
           यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, प्रेरणा बलकवडे, देवळा तालुका युवक अध्यक्ष सुनिल आहेर, दिलीप आहेर, चिंतामण आहेर, शहराध्यक्ष गोटु शिंदे, सचिन सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोरसे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कसमादे मराठी न्यूज  👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :