लोहोणेर जनता विद्यालयात शिक्षक दिन म्हणून साजरा

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : -येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय समिती अनिल आहेर हे होते तर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र शेवाळे, मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मुख्याध्यापक बैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्या शब्दात करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. बी. एखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :