देवळा : - देवळा तालुक्यातील शेरी. (लो.) येथे रस्ता नसल्याने अक्षरशः उभ्या पिकातून अंत्ययात्रा काढण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदनरस्ता खुला करुन मिळावा यासाठी येथील पवार कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु शासन दरबारी भिजत घोंगडे असल्याने रस्त्याचा प्रश्न मात्र कायम आहे. देवळा तालुक्यातील शेरी(लो) येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. गाव नकाशात मात्र या ठिकाणी नैसर्गिक नाला असुन तो सध्या अतिक्रमण केल्याने बंद आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी हा नाला खुला करण्यात यावा यासाठी देवळा तहसीलदारांकडे आधी मागणी केली होती. परंतु गरजेल तो बरसेल काय? या युक्ती प्रमाणे महसूल विभागाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सदर रस्त्याअभावी शेतकऱ्यांना आपला पिकवलेला तयार शेतमाल एक ते दिड किलोमीटर अंतरावरुन डोक - खांद्यावर वाहुन आणावा लागतो. पावसाळ्यात तर या शेतकऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. या शेतकऱ्यांना नेहमीच अशा अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. येथील पवार कुटुंबांच्या परिवारातील वाळु पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रस्ता नसल्याने त्यांची अंत्ययात्रा चक्क अक्षरशः उभ्या पिकातुन काढण्यात आली. यापुर्वी ही रस्ता खुला करण्यात यावा. याचे निवेदन कृषीमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे. हा नाला प्रशासनाने रहदारीस खुला केल्यास शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig