ठेंगोडा प्रतिनिधी - सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्न कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असलेल्या साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील कृषीदुत बागुल शरद रघुनाथ यांनी केदाभाऊ बागुल यांच्या शेतात शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. बीजप्रक्रिया म्हणजे काय ? बीज प्रक्रियेचे फायदे व उत्पादन वाढीवर परिणाम, गुणवत्ता वाढ, रोगांमुळे होणारे पिकांचे नुकसान व बीजप्रक्रियेमुळे आजारांवर नियंत्रण कसे होते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यासोबतच बीज प्रक्रियेच्या पद्धती, त्यासाठी वापरण्यात येणारे विविध रासायनिक आणि जिवाणू संवर्धक याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. बंडगर. एस. एस. , कार्यक्रम अधिकारी औटी मॅडम , व वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नवसूपे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig