देवळा: सरस्वतीवाडी पाणी पुरवठा योजने साठी जि.प.सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेऊन संबंधितांशी चर्चा केली महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या कृतीआराखड्यात वाखारी जि. प. गटातील ८ गावांचा समावेश झाला असून त्यात सरस्वतीवाडी गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने येथील रहिवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वयित व्हावी यासाठी जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या उदभव विहिरीची जागा निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, सरपंच कौशल्याबाई आहेर, उपसरपंच कविता भालेराव, ग्रा.पं. सदस्य शोबना आहेर, विलास भामरे, विनोद आहेर, पो.पा. कैलास आहेर,ग्रामविकास अधिकारी विजय देवरे, अभिमन आहेर, श्रीराम आहेर, ब्रह्मदेव खैरनार, प्रशांत निकम, दिनकर आहेर, वामन बापु, प्रविण वाघ, दादा मेधने, पिंटू भालेराव, भाऊसाहेब आहेर, योगेश भामरे, बापू पवार, विनायक निकम, दादाजी आहेर, केदा अहिरे, भाऊसाहेब भालेराव, बापू आहेर आदी उपस्थित होते.