लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - ठेंगोडा येथील भावसार गल्लीतील व्यापारी उमेश भावसार हे कार्यक्रमा निमित्ताने बाहेरगावी आपल्या नातेवाईकांकडे गेल्याने घराला कुलुप असल्याचे बघुन भुरट्या चोरांनी घराचे कुलुप तोडुन जवळपास एक लाख रूपयाचा सोने, चांदी, व रोख रक्कम सह सुमारे लाख ऐवज घरातील लोखंडी कपाटातुन लंपास केला आहे.
याबाबत उमेश भावसार यांनी सटाणा पोलिस स्टेशन येथे याबाबत अज्ञात भुरट्या चोरांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. काल भावसार कुटूंबीय आपल्या नातेवाईकांकडे गेले असता घराला कुलूप लावले होते नेमका याच संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात भावसार यांच्या घरातील कपाटातुन तीन तोळ्याची सोन्याची गळ्यातील पोत, तीन भार चांदीची साखळी, दोन भार चांदीचे वाळे, व रोख रक्कम अकरा हजार पाचशे रूपये असा एकञित जवळपास एक लाख तीन हजार पाचशे रूपयाचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत ग्रामपंचायत कडुन बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये पोलिस प्रशासनाकडुन पाहणी करण्यात आली असुन या भुरट्या चोरांचा शोध सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास मोरे, महाजन हे करीत आहेत.