लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील गावांत डेंग्यू व चिकनगुनिया ह्या आजाराने आपले हात पाय पसरविण्यास सुरवात केली असुन दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्ण संख्या वाढत आहे.
कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत नाही. तोच ग्रामीण भागात नवनवीन आजाराचें संक्रमण सुरू झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. लहान - मोठे सर्वच खाजगी दवाखान्यात डेंगू व चिकन गुनिया आजाराच्या पेशंटची गर्दी पाहावयास मिळत आहे. आरोग्य प्रशासनाने त्वरित दखल घेऊन चिकन गुनिया डेंग्यू इ आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करावी तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावांतील स्वच्छते कडे प्राधान्याने लक्ष घालून स्वछते सबंधित कामे सुरू करावीत अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात गाजर गवत व इतर गवत व वेलीचें प्रमाण वाढले आहे. सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेले डबके यामुळे डासांचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या साठी संबंधित ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गांभीर्य लक्षात घेऊन सांडपाण्याचा निचरा, बखळ जागेवर व वाड्या वस्तीत प्रतिबंधक फवारणी करणे गरजेचे आहे. जेणे करून आजार आटोक्यात येण्यासाठी मदत होउन नागरिकांना दिलासा मिळेल. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
9765227710 / 7875281316