लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - अंगारकी चतुर्थी म्हणजे श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांसाठी पर्वणी असते. अंगारिकेला अनेक गणेश भक्त पहाटे पासुन मंदीरात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव असुन ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी दिसुन आली. तर कोरोना नियमांचे पालन करून काही भाविकांनी तोंडाला मास्क लावत श्रीचे दर्शन घेतले. मंदिरात गर्दी न करता बाहेरुन श्रीं चे दर्शन घ्यावे या ट्रस्ट च्या आव्हानाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंगारकी निमित्त पहाटे श्रीची महापुजा करण्यात आली. त्यानंतर गाभारा बंद करून सर्वाना श्रीं च्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून स्वयंभू सिध्दीविनायकाची सर्वत्र ख्याती आहे. परराज्यातून तसेच जिल्हयातुन भाविक दर्शनासाठी येतात इतकेच नव्हे तर शेजारील देवळा व सटाणा तालुक्यातील भाविक आपल्या कुटूंबियांसह अनवाणी पायी चालत बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने मंदीराच्या परिसरात मोठी यात्रा भरते. यंदा श्रीं चा गाभारा दर्शनासाठी बंद असला तरी पुजा साहित्य व फराळाची दुकाने थाटण्यात आलेली होती.
बातमी व जाहिराती साठी संपर्क 8390172101/9765227710/7875281316