वाखारी पाणी पुरवठा योजनेसाठी जि. प. सदस्या नुतन आहेर यांची बैठक

                

देवळा-दि. (२७जुलै) वाखारी पाणी पुरवठा योजने साठी जि.प.सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामपंचायत कार्यालय वाखारी येथे बैठक घेऊन संबंधितांशी चर्चा केली महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या कृतीआराखड्यात वाखारी जि. प. गटातील ८ गावांचा समावेश झाला असून त्यात वाखारी गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने येथील रहिवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वयित व्हावी यासाठी जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या   उदभव विहिरीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, मा.सरपंच राहुल पवार, मा.उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ माजी ग्रा. पं. सदस्य नितीन ठाकरे, विलास पवार, रमेश खरे, साहेबराव पवार, बाबुराव गुंजाळ, नानासाहेब पवार,ग्रामविकास अधिकारी निंबा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.




कसमादे मराठी न्यूज  👇


 



                 बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
        8390172101/9765227710/7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :