गिरणा उजव्या कालव्यास खरीप व रब्बी हंगामात मुक्त पाणी सोडण्याबाबत देवळा राष्ट्रवादी यु.चे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन

लोहोणेर( प्रतिनिधी)-मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांना गिरणा उजव्या कालव्यातून खरिप व रब्बी हंगामात मुक्त पाणी पुरवठा व्हावा या आशयाचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदन देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल आहेर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष विजय हिरे यांनी गावातील ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या वतीने  दिले. निवेदनाच्या आशयानुसार देवळा तालुक्यातील लोहोणेर, वासोळ, खालप, खडकतळे, महालपाटणे, निबोंळा, डोंगरगाव, देवपुरपाडे व मालेगाव तालुक्यातील सौदांणे, टाकळी, सोनज, या गावातुन गिरणा उजवा कालवा गेला आहे.व बहुतांश शेतकऱ्यांची पिके या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.तसेच  या  गावातून वाहणाऱ्या गिरणा उजव्या कालव्याला खरीप व रब्बी हंगामात मुक्त पाणी मिळावे.  सदर कालव्याला वर्षातून फक्त रब्बी हंगामासाठी एकच आवर्तन सुटत असल्याने या भागातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न कायम भेडसावत असतो. 
सदर कालव्याला दोन आवर्तने मुक्तपणे सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने सदर कालव्याला मुक्त पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या कडुन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदर मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.

---------------------------------------------------

☑️कसमादे मराठी न्यूज 👇

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :