जि.प. उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांची पालक मंत्री ना. भुजबळांकडून कान उघाडणी

देवळा - (दि.८) : - जिल्हा परिषद वार्षिक योजनेच्या निधी वाटपाचे नियोजन अनेक दिवसांपासून रखडले असून त्यात विरोधी व सत्ताधारी सदस्यांमध्ये निधी वाटपावरून वाद सुरू होता, सदस्यांना विकास कामे करण्यासाठी कमी कालावधी उरला असल्याने गटातील जास्तीत जास्त विकास कामांवर भर देण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत वाखारी गटाच्या सदस्या नूतन आहेर यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांची भेट घेऊन विरोधी पक्षाच्या सदस्यांना अधिक निधी का दिला जातो असा जाब विचारत माझ्या गटात अनेक विकास कामे खोळंबली असून त्यासाठी माझ्या गटास अधिक निधी मिळावा अशी मागणी केली असता सदर मुद्द्यावरून त्यांच्यात वाद उपस्थित झाला होता त्यावरून संतप्त झालेल्या नूतन आहेर यांनी पालक मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन आपबिती कथन केली असता नामदार भुजबळ यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपाध्यक्षांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे समजते त्यात निधी वाटप करताना योग्य नियोजन करण्याचे कडक शब्दात आदेश दिले शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, देवळा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील आहेर, जि प सदस्य यशवंत शिरसाट, यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते.






बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :