धक्कादायक :जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ३० रुग्ण :प्रशासन सतर्क

नाशिक जिल्ह्यात डेल्टा प्लस चे व्हेरियंट चे 30 रुग्ण आढळून आले आहेत , तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याने आज प्रशासनाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात व एकाच दिवशी इतकी संख्या आढल्याने चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे ३० रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये 2 रुग्ण नाशिक शहरातील तर, उर्वरित कळवण, नांदगाव, सिन्नर, येवला या वेगवेगळ्या तालुक्यांतील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
ग्रामीण भागात रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाला आठवडा उलटत नाही तोच, आता डेल्टाचे संकट आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग मात्र चांगलाच सतर्क झाला आहे.

नाशिकमधून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला १५५ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :