लोहोणेर (प्रतिनिधी ) : - येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्रचे माजी सरचिटणीस स्व.कर्मवीर डॉ.वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक बी. के. जाधव होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यालयाच्या विद्यार्थिनी अंकिता शैलेंद्र मगर व सिद्धी महेश सूर्यवंशी यांनी पवार यांच्या कार्याची ओळख ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातुन करून दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.
-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig