'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन..

टीव्ही जगतातील 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले . त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, त्यांना ​​रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.'रामायण'मध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका 'विक्रम आणि वेताळ'मध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती.अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेदेखील गुजराती सिनेमांतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतून अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी

अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
 त्रिवेदी यांनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनविण्यात आले होते. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदारही झाले होते.


 
 -----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :