गडावरील ज्योतीने पेटला खान्देश मधील घटस्थापनेचा दिवा...

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - खान्देश भागातील भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरून नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी आज घरोघरी घटस्थापना झाली आहे. घरगुती व सार्वजनिक नवरात्र उत्सव निमित्ताने घटस्थापना करतांना दहा दिवस आदी माये समोर दिवा लावला जातो. सदर दिवा प्रजवलीत करण्यासाठी खान्देश मधील तरुण गडावर जाऊन मशाली द्वारे ज्योत घेऊन जातात.या मशाली च्या ज्योती तुन आपला घराचा अथवा मंडळाचा दिवा प्रजवलीत करीत असतात. त्यासाठी हे तरुण अनवाणी पायाने रात्रीचा दिवस करीत आपले गाव गाठीत असतात. एक हातात मशाल साथीला मित्र व कार्यकर्ते डफ डीजे असा त्यांचा प्रवास असतो. काल व आज बुधवारी रात्री कसमादे रस्ते या मशाली ने प्रजवलित झालेले दिसत होते. गुरुवारी घटस्थापना होणार असल्याने आज सकाळ पर्यत मशाल धारी युवकाची गर्दी रस्त्यावर सर्वत्र दिसत होती. याच मशालीच्या ज्योतीने आज खान्देशमधील घटस्थापने चे दिवे प्रजवलीत झाले आहेत. कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी दिसणारी मशाल घेऊन आपले गाव लवकर गाठावे म्हणून अनवाणी पायाने धावत गावाकडे आपल्या घराकडे निघालेले युवक रात्री - पहाटे दिसल्या नंतर सर्वसामान्य आई भक्त कोरोना ला एकदाच जाऊ दे पुन्हा पूर्वी सारखे आनंदाचे वातावरण निर्माण होवो अशी मनोमन प्रार्थना करीत मशाल ज्योती चे दर्शन घेऊन आदी माया आई भगवती सप्तशृंगी मातेला साकडे घातले.

 -----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :