दीड वर्षा नंतर बाप्पाचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - कोरोना च्या महामारी मुळे गेल्या दीड वर्षा पासून बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे राज्यात आज सर्वत्र उघडली आहेत.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर आज पहाटे महापूजे नंतर भाविकांना दर्शनासाठी श्रीचे मंदिर उघडल्या नंतर श्रीच्या दर्शना चे पहिले मानकरी ठरले धुळे येथील बाप्पा चे भक्त श्री मोनू ह्र रल त्यानी यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की मी सिद्धिविनायक मंदिरात दर्शना साठी नेहमी येतो. परंतु कोरोना मुळे मंदिर बंद असल्याने साधरण दीड वर्षा नंतर आज बाप्पा च्या चरणावर मस्तक ठेवायला भेटले. त्यामुळे मी खूप समाधानी आहे रात्रीच ठरवले होते की सकाळी आरती ला जायचे परंतु आज चक्क मलाच आरतीचा मान भेटला ही श्रीची कृपा प्रसाद समजतो मी परमेश्वराचा खूप आभारी आहे. तसेच सिद्धीविनायकाचे सेवेकरी लोहोणेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक अलई हे सुद्धा दर्शनासाठी सकाळी उपस्थित होते. त्यानी यावेळी बोलताना सांगितले की नवसाला पावणारा गणपती म्हणून देवाची ख्याती आहे कोरोना च्या तिसरी लाट येणार म्हणून सर्व दहशती खाली आहेत. देवाला विनंती करतो की संपूर्ण हिंदुस्थान हा करोना मुक्त होऊ द्या.


 -----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :