लोहोणेर येथे सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य शोभा यात्रा

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - येथील सावता महाराज मंदिरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा रुजू केली. आज सायंकाळी लोहोणेर गावांतून भजनी मंडळाचे गजरात सावता महाराज प्रतिमेची सजवलेल्या बैल गाडीवरून शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत लोहोणेर, ठेंगोडा, विठेवाडी आदी गावासह परिसरातील भजनी मंडळ, कलश धारी महिला सह अबाल वृद्ध व महिला तसेच सावता महाराज सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

      



बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :