कलाविश्वातील प्रतिष्ठेचा ९३ वा ऑस्कर सोहळा

 कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ९३ व्या ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला.



कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता २०२१ ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणाचंही निवेदन आणि प्रेक्षकसुद्धा नव्हते. तसेच दरवर्षीप्रमाणे अत्यंत प्रतिष्ठेचा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होत असतो. परंतु या वर्षी जगावरील संकट बघून दोन महिने पुढे ढकलण्यात आला होता. यंदा कोणी बाजी मारली व सोहळ्यातील काही महत्त्वाचे क्षण...  


✅ सर्वोत्कृष्ट चित्रपट- नोमाडलँड

✅ सर्वोत्कृष्ट अभिनेता- अँथनी हॉपकिन्स (द फादर)

✅ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)


इरफान खान आणि ऋषी कपूर यांना ऑस्कर पुरस्कार अकादमी कडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

✅ सर्वोत्कृष्ट गीत- फाईट फॉर यू (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

✅ सर्वोत्कृष्ट संगीत- सोल

✅ सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग- साऊंड ऑफ मेटल (मिकेल ई. जी. निल्सेन)

✅ सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- मँक

✅ सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- मँक

✅ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- युह जंग युन (मिनारी)

✅ सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- टिनेट

✅ सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- माय ऑक्टोपस टिचर

✅ सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट सब्जेक्ट)- कोलेट

✅ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- सोल

✅ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

✅ सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन लघुपट- टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

✅ सर्वोत्कृष्ट ध्वनी- साऊंड ऑफ मेटल

✅ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नोमाडलँड (क्लोई शाओ)

✅ सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- मा रेनेस ब्लॅक बॉटम (अॅन रॉथ)

✅ सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेअरस्टायलिंग- मा रेनेस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेझ-रिव्हेरा, मिया निलँड, जामिका विल्सन)

✅ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- डॅनिअल कलुया (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

✅ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- अनदर राऊंड (डेन्मार्क)

✅ सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले- द फादर

✅ सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- प्रॉमिसिंग यंग वुमन (एमराल्ड फेनेल)


पुरस्काराविषयी ?  

ऑस्कर नामांकनाच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच  पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील प्रत्येक फिल्म मेकर्स प्रयत्न करतात. जगभरात सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहचतात आणि त्या पैकी पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळते व एकाला ऑस्कर दिला जातो. या वर्षी नोमाडलँड  या फिल्मसाठी चुलू जौ हिने बेस्ट डायरेक्टर ऑस्कर पुरस्कार पटकावला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :