Follow (👈 Subscribe साठी)
चेन्नई सुपर किंग्जनेचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या कामगिरीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर शानदार विजय मिळवला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान प्राप्त केले.
कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटाकत १९१ धावा केल्या. यात एकट्या जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. १ षटकात ३७ धावा पटकावल्या नंतर आयपीएलच्या इतिहासातील युवा गोलंदाज हर्षल पटेल चे २० सावे षटक सर्वात महाग ठरले.
१९२ धावांचे लक्ष्य घेऊन विजय प्राप्त करण्यासाठी बेंगळुरूची सुरूवात उत्तम होती. पण ती ३ षटकापूरतीच मर्यादीत ठरली. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांनी ४४ धावा केल्या. सॅम करन पहिल्याच चेंडूवर विराट कोहली (८ धावा) बाद झाला. त्यानंतर शार्दुलने देवदत्तला बाद केले. देवदत्तने १५ चेंडूत ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला जडेजाने बाद केले. त्यानंतर धोकादायक ग्लेन मॅक्सवेलची बोल्ड त्याने काढली. तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॅनियल ख्रिस्टिनला जडेजाने धावबाद केले.
त्यानंतर बंगळुरूची अवस्था ५ बाद ८१ अशी होती. मैदानावर एबी डिव्हिलियर्स असल्याने आरसीबीला आशा होत्या. पण जडेजाने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने एबीला बोल्ड केले आणि बेंगळुरूचा पराभव निश्चित केला. तसेच गोलंदाजीतसुद्धा ४ षटकात १३ धावा देत ३ विकेट तर क्षेत्ररक्षणात एकाला धावबाद केले. बेंगळुरूने २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या.
Follow (👈 Subscribe साठी)