लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - सालाबादप्रमाणे यंदाही येथील सावता महाराज मंदिरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला असून यानिमित्ताने अनेक नामवंत कीर्तनकार आपली सेवा रुजू करीत आहेत. सावता महाराज सप्ताहाच्या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.सुदाम महाराज लोहोणेर कर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने ह.भ.प.नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव ), पंकज महाराज (बेटावद), गोपाळ महाराज (चिमठाणकर ), बालाजी महाराज मोहिते (वांगीकर ), भरत महाराज जोगी ( परळी बैजनाथ), रविकिरण महाराज (सिंदखेडा ), प्रकाश महाराज जाधव ( धुळे), आदी नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा रुजू करीत आहे.दि.८ऑगस्ट रोजी सकाळी प्रकाश0 महाराज जाधव (धुळेकर ) यांचे काल्याचे किर्तना नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावता महाराज सेवेकरी मंडळ, भजनी मंडळ व लोहोणेर ग्रामस्थांनी केले आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig