लोहोणेर ( विशेष प्रतिनिधी ) : - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. देवळा तालुक्यातील भऊर या गावाच्या वतीने आज दि ३ ऑगस्ट मंगळवार रोजी भारतीय सैन्य दलाच्या ९ मराठा लाईट इन्फन्ट्री या दलात १७ वर्षांच्या खडतर सेवेनंतर विनोद नारायण पवार यांचे गावांत जंगी स्वागत करण्यात आले.
विनोद पवार यांचा सन्मान करण्यासाठी गावातील सर्व नागरिकानी एकत्र येत त्यांचे जंगी स्वागत केले. सोबतच ग्रामस्थांनी या गावाच्या वीर सुपुत्राची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. भऊर
गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह ग्रामस्थांनी ठरविले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा माजी सुभेदार कारभारी हरी पवार होते. यावेळी सरपंच दादा मोरे, उपसरपंच सविता पवार, पोलीस पाटील भरत पवार, तंटामुक्त अध्यक्ष नितीन पवार, भऊरचे तलाठी नितीन धोंडगे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन काशिनाथ पवार, प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष सुभाष पवार, स्वप्निल ॲग्रोचे संचालक अरुण पवार, केदा पवार, माजी सैनिक संतोष पवार, उत्तम जाधव देसराणेचे जिभाऊ हिरे, यशवंत आहेर, शरद पवार, रमेश पगार, यशवंत पाटील, साहेबराव आहेर, विमलबाई पवार, कविता पवार, संदीप पवार, दीपाली पवार, वर्षा पवार, रमेश पगार, राजू पगार, उज्ज्वला पवार, करण पवार, संचीता पवार, शशिकांत पाटील, अनिता पवार, नाशिकचे सुरेश पवार, विलास पवार, दीपक पवार, डॉ. भाऊसाहेब पवार, पांडुरंग पवार, बापु गरुड, कौतिक पवार, त्र्यंबक पवार, सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पवार, बाळासाहेब पवार, आप्पा जोंधळे, किशोर पवार ,अशोक महाजन, अमोल पवार, विश्वास पवार, नानाजी चव्हाण, देविदास बोरसे, बाबा पवार आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. पी. आहेर यांनी केले.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig