देवळा ( प्रतिनिधी ) : - महिला व बालकल्याण विभाग पोषण आहार योजनेअंतर्गत देवळा येथील अंगणवाडी चे नवीन इमारत भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका वत्सलाबाई आहेर तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या नूतन आहेर, पं.स. सभापती शांताबाई पवार, उमराणे गट जि.प. सदस्य यशवंत शिरसाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनीलआबा आहेर, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती अश्विनी आहेर म्हणाल्या की, जिल्ह्यात कुपोषण, भरती प्रक्रिया व पोषण आहाराचा प्रश्न प्रलंबित होता. महिला व बालकल्याण सभापती म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर सर्वप्रथम हे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. कोरोना महामारीत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी देवदूत बनुन कार्य केले. त्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. त्याच प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मदतनीस ते थेट सेविका या पदावर पन्नास महिलांना लाभ दिल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. देवळा शहरातील सर्वप्रथम व सर्वात जुनी असलेल्या बालवाडी ची झालेली दुरावस्था यांचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. व माळवाडी येथील अंगणवाडी चे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. देवळा येथील अंगणवाडी भूमिपूजनप्रसंगी उपनगराध्यक्ष अतुल पवार, नानू आहेर, किरण आहेर, कौतिक हिरे, धनाजी आहेर, प्रफुल्ल आहेर, दुलाजी आहेर, चिंतामण आहेर, शांताराम आहेर, प्रताप आहेर, शरद आहेर, पप्पू हिरे, विलास पवार, पप्पू बोरसे, निंबा आहेर, सुनंदा आहेर, मोठाभाऊ हिरे, करण आहेर, दौलत आहेर, सचिन आहेर, शुभम आहेर, माणिक शिंदे, प्रवीण गुंजाळ, सतीश गांगुर्डे तसेच माळवाडी ग्रा.पं. सरपंच शिवाजी बागुल, रिंकू जाधव, सुशांत गुंजाळ, सुरेश जगदाळे, दिलीप शेवाळे, बापू बागुल, सुरेखा बागुल, यशोदाबाई खैरनार, मयूर सोनवणे, मनोज गुजरे, ग्रामसेवक संभाजी देवरे, पर्यवेक्षिका शकुंतला पवार, कल्याणी चव्हाण, अंगणवाडी संघटना अध्यक्ष जिजाबाई अहिरराव, देवळा विभागातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सुनिता थोरात यांनी केले.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig