लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर येथील प्रगतीशील शेतकरी तुळशीराम बारकू बागुल यांच्या पत्नी रेश्माबाई बागुल यांच्या मालकीच्या शेळ्या वर गुरुवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान लांडग्यांच्या कळपाने हल्ला केल्याने या हल्ल्यात बागुल यांच्या एकूण १५ शेळ्या पैकी नऊ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून याच बरोबर लगतच्या किशोर बागुल यांच्या मालकीच्या ऐका शेळीचा ही हया लाडग्यांनी फडशा पडल्यामुळे पशु पालक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मयत शेळ्यांचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रीतसर पंचनामा केला असून बागुल कुटूंबियांनी मात्र नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, गुरुवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान येथील शेतकरी तुळशीराम बारकू बागुल यांची पत्नी सौ.रेश्माबाई तुळशीराम बागुल यांची लोहोणेर काळवट धरणाच्या लगत (गट नंबर ४२९ ) शेत जमीन असून बागुल कुटूंबीय याठिकाणी वास्तव्यास आहेत. गुरुवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान घराच्या बाजूला पडवी वजा पत्र्याचे शेड मध्ये बांधलेल्या शेळ्यावर अचानक लाडग्यांच्या कळपाने हल्ला चढवला. एकूण पंधरा शेळ्या पैकी सुमारे नऊ शेळ्या या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या आहेत तर तीन शेळ्या गंभीर जखमी अवस्थेत आहेत. व उर्वरित तीन शेळ्या लाडग्यांनी लंपास केल्या आहेत.दरम्यान या घटनास्थळा पासून काही अंतरावर असलेल्या परशराम कौतिक बागुल यांचीही एक शेळी हया लाडग्यांनी फस्त केली असून एक इतर दोन शेळ्या लंपास केल्या आहेत. पहाटे अचानकपणे लाडग्यांनी शेळ्यांवर हल्ला चढविल्याने बागुल कुटूंबियांना याची चाहूल लागताच सर्वांनी एकत्र येऊन लाडग्यांना पळवून लावले. दरम्यान योगेश पवार यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून लाडग्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्याचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे बागुल कुटूंबियांचे सुमारे ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त कुटूंबियांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
"गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक लाडग्यांनी पडवीत बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढवला मात्र गेल्या एक - दीड महिन्यापासून लोहोणेर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने बिबट्याने च आपल्या शेळ्यांवर हल्ला चढवला असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वन विभागाच्या वतीने हा हल्ला बिबट्याचा नसून लाडग्यांनी केल्याचे निष्पन्न झाले."
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig