श्री संत महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन.

महाराष्ट्र सारस्वत मांदीयाळीतील एक कोहीनूर रत्न हरपले. अखेरच्या श्वासापर्यंत वारकरी संप्रदायाची शिस्त आणि अनुशासन जोपासणारे आणि गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त असलेले शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले मंदिराचा कारभार टाकून बाबा कायमचे पडद्याआड गेले..
श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव (बुलढाणा) मंदिराचे विश्वस्त श्री शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी या देवस्थानाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व वैद्यकीय सुविधांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे सुरु केले.
त्याचा या परिसरातील नागरिकांना फायदा झाला होता. मंदिराच्या माध्यमातून सुरु केलेला अन्नछत्र हा उपक्रम त्यांच्या कुशल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण होते.याशिवाय त्यांच्या पुढाकाराने केल्या जाणाऱ्या मंदिराच्या एकंदर व्यवस्थापनाची हॉवर्ड या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाने नोंद घेतली होती.
शिवशंकरभाऊ व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जात असत.शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316


कसमादे मराठी न्यूज  👇


 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :