Covid19 Vaccine भरघोस प्रतिसाद : दिवसभरात १.३३ कोटी नागरिकांची नावनोंदणी


cowin.gov.in या लसीकरण नाव नोंदणी करणाऱ्या अधिकृत वेबसाईटवर बुधवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून जवळपास १.३३ कोटींहून अधिक लोकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली.


LockDown चर्चा : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण मोहीम जोरदारपणे सुरू होतेय. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्ती लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी बुधवार (२८ एप्रिल) पासून 'कोविन' हे लसीकरण नोंदणी प्लॅटफॉर्म खुलं करण्यात आलंय. बुधवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, 'cowin.gov.in वर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जवळपास १.३३ कोटींहून अधिक लोकांनी लस घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केलीय.
राज्य आणि खासगी लसीकरण केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्याच्या आणि स्लॉटच्या आधारावर नागरिकांना लसीकरणासाठी वेळ दिली जाणार आहे. लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं महाराष्ट्र आणि राजस्थानात मात्र १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार नाही. या राज्यांत १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिस्ट्रेशनला सुरुवात झाल्यानंतर काही वेळ वेबसाईटवर काही त्रुटी आढळून आल्या. परंतु, त्या दूर झाल्यानंतर कोविन या वेबसाईटवर एका मिनिटाला जवळपास २७ लाख हीटस् मिळाले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांसहीत करोना योद्ध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आलं. तर ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं होतं. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना https://www.cowin.gov.in/home वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. 




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :