देशावर ही परिस्थिती तुमच्यामुळेच : करीना कपूर भडकली

Top Post Ad


अभिनेत्री करीना कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिने देशातील करोनाबाबतच्या स्थितीबद्दल तिचे मत मांडले आहे. 

LockDownचर्चा : अभिनेत्री करिना कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये देशात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यात ती म्हणते, ' एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आलेली नाही ती म्हणजे लोक अजूनही इतके निष्काळजीपणे कसे वागत आहेत. देशामध्ये सध्या काय स्थिती आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. त्यामध्ये घराबाहेर पडताना चेह-यावर मास्क नीट पद्धतीने लावणे अपेक्षित आहे. परंतु घराबाहेर पडताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात आणि करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने वागणा-यांनी करोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांचा किमान एकदा तरी विचार करायला हवा...'

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

बातमी व जाहिराती साठी संपर्क :