ड्रग्ज माफीया रुबिना नियाज शेख हीची मालेगाव येथे तीन बंगले व सुमारे दोन कोटींची संपत्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे.या नंतर स्थानिक पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.शनिवारी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मालमत्तेची चौकशी केल्याचे समजते. दरम्यान मालेगाव शहरातील उच्चभ्रू तरूण एमडी नशेच्या आहारी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.रुबिना शेख हिला अमली पदार्थांची तस्करी व विक्री केल्याप्रकरणी मुंबई नार्को टेस्ट विभागाने अटक केली असुन तिचे मालेगाव कनेक्शन उघडकीस आले आहे.याबात परिसरातील उच्चभ्रू तरूण वर्ग या नशेच्या आहारी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शनिवारी गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रूबिना हिच्या मालमत्तेची पाहणी केली आहे.मुबंई नार्को टेस्ट विभागाने तपासणी साठी मदत मागितली तर पुर्णपणे मदत केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक मा.चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.