साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - सटाणा, देवळा, चांदवड या तीन तालुक्यातून जाणारा साक्री - शिर्डी ह्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या महामार्गावरून दररोज बरेचसे लोकप्रतिनिधी नाशिक येथे जा - ये करीत असतात मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्या कडे कोणाचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. या महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले असल्याने दक्षिणेकडे कडून गुजरात व राजस्थान सह भागातील होणारी वाहतूक इतरत्र मार्गावरून वळून जात असल्याने याचा व्यावसायिकाना मोठा फटका बसला आहे. सावळीविहीर - साक्री - समोडे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून सदर रस्ता हा साक्री - शिर्डी म्हणून नव्याने ओळखला जात आहे. सदर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने हा महामार्ग आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले जाते आहे. ही शुभ वार्ता असली तरी सद्या हया महामार्गाची अवस्था अंत्यत बिकट झाली असून ठीक - ठिकाणी मोठं - मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना अत्यंत कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते. यामुळे या रस्त्यावर नियमित लहान - मोठे अपघात घडत असतात. विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरुन दररोज बहुसंख्य लोकप्रतिनिधी नाशिक येथे जात- येत असतात मात्र या रस्त्याची अवस्था पाहून आता पर्यत कोणीही शासन दरबारी आवाज उठवला नाही किंवा सदर महामार्ग दुरुस्ती साठी पाठपुरावा केला नाही ही खेदाची बाब आहे. सदर रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने दक्षिणेकडील राज्यातून उत्तर भारतात होणारी माल वाहतूक इतरत्र वळून जात असल्याने या महामार्गलगत असलेले हॉटेल व इतर व्यवसायिक आपले धंदे ओस पडल्याने हतबल झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या परिसरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मुळात या परिसरातील लोकप्रतिनिधी जागरूक आहेत मग त्याचे या हम रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्याकडे लक्ष वेधले जाणे गरजेचे आहे. सदर लोकप्रतिनिधी सुद्धा हया रस्त्यावर मार्गक्रमण करीत असताना खड्यामुळे गचके खात प्रवास करत असताना हे हिसके कसे सहन करतात मग हया रस्त्याच्या दुरुस्ती साठी का?.मूग गिळून गप्प बसले आहेत. याबाबत शंकेची पाल सर्वत्र कुणकुण करीत आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांचे नाहक बळी गेले आहेत अजून किती जणांचे प्राण गेल्यावर लोकप्रतिनिधीना सदर महामार्ग दुरुस्ती साठी जाग येईल हे पाहणे या भागातील जनतेच्या नशिबी असावे अशी चर्चा सद्या या परिसरातील जनतेत दबक्या आवाजात सुरू आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :