देवळा : - कोविड पश्चात शिक्षण व्यवस्थेतील अडचणींवर मात करत विद्यार्थीची मानसिकता लक्षात घेत शिक्षण प्रक्रिया पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे. त्यासाठी सर्वंकश प्रयत्न करण्याचे आवाहन शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी केले.
रोटरी क्लब देवळा टाऊन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षकांना संबोधतांना व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ देवळा व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ देवळा यांच्या संयुक्त विध्यमाने या वर्षीच्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनी देवळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात सेवाभावी समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक सन्मान देऊन गौरविण्यात आले.
शिवव्याख्याते प्रा यशवंत गोसावी,श्रद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार ,प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्रातंपाल डाॕ व्ही एम निकम,उप प्राचार्य डॉ मालती आहेर,गटशिक्षणअधिकारी सतिष बच्छाव,रोटे सुनिल देवरे,खंडु मोरे याप्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवळा तालुक्यातील वृषाली देसले(वासोळ), सोमनाथ शिवले,(हनुमाननगर,सावकी ), समाधान सोनवणे (डोंगरगाव), किरण पाटील (शेरी), वंदना भामरे(देवळा मुली), चंद्रकांत मोरे (वाखारवाडी), अर्चना काकडे(वाखारी). माध्यमिक शिक्षकांमधून के आर चौरे(इंदिरा विध्यालय खर्डे), कौतिक खोंडे(श्री शिवाजी मराठा इंग्लिशस्कुल देवळा), मनोहर सावंत(पिंपळेश्वर विद्यालय वाखारी), एस टी भामरे(मुख्याध्यापक जनता विद्यालय खामखेडा), अशोक सावंत, (जनता विद्यालय मटाने), उखा सावकार(विद्यानिकेतन पब्लिक स्कुल देवळा), रविंद्र शिरसाठ (कर्मवीर रामरावजी आहेर कनिष्ट महाविद्यालय देवळा), प्रा संजय आहेर(इंदिरा गांधी उच्य माध्यमिक विद्यालय खर्डा), प्रा सुवर्णा ठाकरे(जनता व उच्य माध्य विद्यालय लोहणेर), प्रा बी डी खैरनार( क्रीडा मार्गदर्शक), विजयकुमार जोशी,(कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा), प्रा डॉ प्रकाश शेवाळे,(पंचवटी नाशिक) आदि शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आहे. रोटरॅक्ट क्लबच्या वतीने” नन्हे कान्हा” हि बाल गोपाळासाठी घेतलेल्या स्पर्धेतील अकरा स्पर्धकांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी देवळा आयटीआय येथे रोटरी क्लबच्या वतीने शंभर वृक्षाची लागवड करण्यात आली.
या वेळेस रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ विश्राम निकम, डॉ वसंतराव आहेर, कौतिक पवार, प्रितेश ठक्कर, संजय पाटील, सुनिल आहेर, कौतिक पवार, संदीप पगार, वैभव पवार, दिनेश सोनार, विनोद देवरे, सोमनाथ जगताप, मोठाभाऊ पगार, संजीव आहेर, वैभव पवार ,आदेश ठाकरे, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य रितेश निकम, जय बच्छाव, मुकुंद बागुल आदी सदस्य उपस्थित होते. संजय पाटील यांनी सुत्रसंचलन केले. खंडू मोरे यांनी आभार मानले.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig